मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Tuesday, January 27, 2026

|| लिव्ह इन सेकंड इनिंग ||

    

 

 

 

वैधुर्याला [ / वैधव्याला ] ठाउक नव्हते

घंडायची होती तंव भेंट

नेहा भिडतां , अलगद शिरलो

डोळ्यांतुन काळजांत , थेट                || ||


क्षणात एका , ' सप्तदशी ' ने

कशी टांकली न कळे , कात

ओंळख , स्वारस्यांत बदलली

रंग जगाला चंढले सात                     || ||


साध्या-साध्या संवादांतुन

ऐकूं आले गुणगुणणे

' उर्वरीत ' बोलल्याविणेही

तुझे मला कळले म्हणणे                     || ||


सहवासाची शाल मखमली

रुसव्या-फुगव्यांनी विणणे

बेलबुट्टि भंरतांना , नाही

हौस तुझी-माझी शिणणे                     || ||


वर विधि चा , ' नरजन्म ' असे हा

आंकळतां हें , लवलाही

रडत-कुढत , उर्वरीत जीवन

जगायचे कारण नाही                         || ||


गेलेले परतणार नाहित

कठोर वास्तव स्वीकारूं

उणीव पहिल्या ' अर्धांगां ' ची

डावात दुज्या पुरी करूं                      || ||


वाजवितां येतोच दुतोंडी

जनापवादांचा ढोल

संकटकाळीं साद घालितां

कोण धांवते ? तें बोल                         || ||


पोरें-बाळें ही गुरफटलीं

ज्यांच्या-त्यांच्या संसारीं

एकटेपणाची ही भंयकर

जाणीव च , काळीज चिरी                    || ||


तरी न खंचतां , अनमोल असे

उरले-सुरले दिवस जगूं

तिन्हीसांजही आयुष्याची

रसिकपणाने उपभोगूं                         || ||


तन-मन-धन वेचूं दोघेही

उगीच हात न आंखडतां

परस्परांसाठी च झिजावे

गरज न घेण्याची शपथा                     || १० ||

 

म्हणोत कोणी ' म्हातारचळी '

म्हणोत ' वेडे ' कुणी , खुशाल

आंतरीक ओढिची , भंरजरी

मिरवूं ही , अंगावर शाल                     || ११ ||


**********************************

-- रविशंकर.

२७ जानेवारी २०२६

Saturday, March 22, 2025

|| भणंग पंचविशी ||

 

                    || भणंग पंचविशी ||


 

," यू. एस. मॅन, आय. टी. यार

चंगळबाजी अपरंपार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


शिकायलाच, ठाम नकार

डोकं राहे गारेगार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


पन्नास लाख मोजले, की

डिग्री हातोंहात तयार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


तेंव्हढे खिश्यांत नव्हतें, म्हणून

' दहावी नापास ' राहिलो, यार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


नोकरी देई ना सरकार

रांखीव जागांत मारामार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


' दहावी नापास ' उमेदवार

' आय. टी.’ शिवाय, कोण घेणार ?

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


डॉलरमध्ये नाही पगार

वेठबिगारी ' चा आधार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


अठरा तास राबराबून

कमाई पन्नास हजार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


नायके ' ‘ रीबॉक ' घ्यायलाही

पुरत नाही पगार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || ||


' फियाट ', नाही ' हयाट ' नाही

कसलं हें जिणं भिकार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!     || १० ||


हॉटेलांत भोजन तयार

स्विग्गी ' फिरतोय दारोंदार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!     || ११ ||


फोन लावतां, सगळं हंजर

कांही मिळत नाही उधार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!     || १२ ||


क्रेडिट कार्डांवर झांलंय

माथीं, कर्ज भारंभार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || १३ ||


भरूं हप्ते जमलं तर

घालोंत खेंटे देणींदार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || १४ ||


आपलं आपण कमवा-उडवा

हा च ' नेकी चा व्यवहार '

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || १५ ||


आपली ' स्पेस ' न् आपण बरे

हंवाय कुणाला जोडीदार ?

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!     || १६ ||


नकोत, कमाई त वाटे

न् पोंरांटारांचं लेंढार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || १७ ||

 

कसलीं नातीं ? कुठली गोतीं ?

सारा खुळ्यांचा बाजार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || १८ ||


लिव्ह इन ' मध्ये, कसं

विना जोखीम, हिरवंगार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || १९ ||


पटलं, तर ठीक, अथवा

विटलं, तर ' आप्पटबार '

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || २० ||


आया-बापां चे, झालेत

हुकूमशहां चे अवतार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || २१ ||


अर्ध्या चड्ड्यांत फिरायची

इथं झालीय मारामार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || २२ ||


एकदां ' यू. एस.’ गांठली, की

आहेच कोण विचारणार ?

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || २३ ||


एच. वन बी. ’ साठी मरतोय

तोंवर तोंड गप्पगार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || २४ ||


तेंव्हढा लग्गा लागला, की

सगळं टांकून, छू पसार

यू. एस. मॅन, आय. टी. यार

चंगळबाजी अपरंपार

फांटक्या जीन्स, विटके टॉप्स

किंमत फक्त वीस हजार !!      || २५ ||

 

*******************************

 

रविशंकर.

२१ मार्च २०२५.